आपल्या देशात जे काही होईल त्याला आपणच जबाबदार असणार आहोत – मोहन भागवत

94

नागपूर,दि.२८(पीसीबी) – देशात जे काही होत आहे त्याला आपणच जबाबदार आहोत, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. नागपूरमध्ये नवोत्साह २०२० या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भागवत बोलत होते.

यावेळी त्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान प्रदान करताना केलेल्या भाषणादरम्यान दिलेल्या इशाऱ्याची आठवण करुन दिली. काहीतरी राहिलंय, काही झालं नाहीये. उटलं सुटलं ब्रिटीशांना दोष देऊन चालणार नाही, असंही मोहन भागवत म्हणाले आहेत.

दरम्यान, राजकीय दृष्ट्या आपण विभागलो गेलो आहोत, मात्र आता आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. देशावर आता आपलं राज्य आहे. मात्र स्वातंत्र्य अबाधित रहावे आणि राज्य व्यवस्था सुरळीत सुरु रहावी यासाठी सामाजिक शिस्तीची गरज आहे, असं भागवत यांनी सांगितलं आहे.