आपण बारामती जिंकली आहे; मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांमध्ये भरला जोश

228

खडकवासला , दि. १८ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. मागे होऊन गेलेल्या सर्व निवडणुकीत तुम्ही प्रचंड काम केले आहे. आता लोकसभा निवडणुकीत अधिक काम करा. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचा, आपण बारामती जिंकली आहे, असे सांगून कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्र्यांनी जोश वाढविला. 

मुख्यमंत्री फडणवीस यांची  पुण्यातील  खडकवासला मतदार संघातील कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक घेतली.  या बेठकीला पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले की , तुमच्या बुथवर किती मतदान झाले. याची माहिती निवडणुकीनंतर आम्हाला  समजणार आहे. कोणी काम  केले नाही. हे तुमच्या गावात झालेल्या मतदानावरून  समजणार आहे.  येथील उमेदवार निवडून आल्यानंतरचे श्रेय तुमचे आहे, असे ते म्हणाले .

लोकसभा निवडणूक मॅनेज झाली आहे. पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्याशी  पवार साहेब यांचे संबंध चांगले  आहेत, असे सांगून तुमचे लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून  सुरू  आहेत.  मीडिया व अफवा स्टंटबाजी या गोष्टींकडे  अजिबात लक्ष देऊ नका,  असेही मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना  कानमंत्र  दिला.