आपटे रस्त्यावर कुजलेली फांदी डोक्यात पडून दिव्यांग महिलेचा मृत्यू

80

पुणे, दि. ११ (पीसीबी) – कुजलेली फांदी डोक्यात पडल्याने एका दिव्यांग महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.१०) दुपारी बाराच्या सुमारास पुण्यातील आपटे रस्त्यावर घडली.

जयश्री जगताप (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या प्रहार क्रांती अपंग संघटनेच्या पदाधिकारी होत्या.

प्राप्त माहितीनुसार, बुधवारी दुपारच्या सुमारास पुणे महापालिकेकडून नेहरु सांस्कृतिक केंद्रामध्ये दिव्यांगांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी प्रहार क्रांती अपंग संघटनेच्या पदाधिकारी असलेल्या दिव्यांग जयश्री जगताप या इतर सहकाऱ्यांसोबत चहा पिण्यासाठी संतोष बेकरी जवळील एका चहाच्या दुकानावर आल्या होत्या. त्यावेळी त्या ठिकाणच्या एका झाडाची कुजलेली फांदी जयश्री यांच्या डोक्यात पडली. यावर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.