आनंदराव अडसूळ आता ईडी च्या ताब्यात

38

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे होणाऱ्या कारवायांमुळं अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडी चांगलीच चर्चेत आहे. शिवसेना नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांनी सिटी बँकेत 900 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला होता. त्यामुळं ईडीने अडसूळ पितापूत्रांना चौकशीसाठी बोलावत समन्स पाठवलं होतं. पण, आज सकाळी ईडीचे अधिकारी अडसूळ यांच्या घरी चौकशीसाठी हजर झाले, त्यानंतर काही तासांनी ईडीनं आनंदराव अडसूळ यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली.

अडसूळ यांना तातडीनं गोरेगावच्या रूग्णालयात नेण्यात आल्यानंतर याविषयी भाजप नेते किरीट सोमय्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ईडीकडून अडसूळ यांना समन्स पाठवण्यात आलं, मात्र त्यांनी चौकशीसाठी टाळाटाळ केली आहे. पण, आता अडसूळ यांना ताब्यात घेताच ते आजारी पडले, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेत कोट्यवधी रूपये अडकलेले आहेत. पण, याविषयी अडसूळ आणि राज्य सरकार काही बोलत नाही. अडसूळ पिता-पूत्रांनी कोट्यवधी रूपये आपल्या खाजगी खात्यात वळवले आहेत. बाप बेटे मजा करत आहेत. कर्नाळा बँकेच्या प्रकरणातही कोणतीच कारवाई झाली नाही, पण आता ईडीनेच कारवाई केली आहे. या कारवाईचं मी स्वागत करतो, असं सोमय्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हसन मुश्रीफांनी मला कोणत्याही प्रकारे अडवलं तरी मी त्यांच्या अन्य घोटाळे बाहेर काढत त्याची तक्रार करणार आहे. शरद पवारांकडून हे फक्त लुटा हेच शिकलं आहेत. शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी मला थांबवून दाखवावं. पोलिसांचा गुंडांप्रमाणे वापर करतात. हसन मुश्रीफांना तुरूंगात जाण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही, असा इशारा सोमय्यांनी मुश्रीफांना दिला आहे.

WhatsAppShare