आधार क्रमांक सोशल मीडियावर शेअर करु नका – यूआयडीएआय

150

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) –  भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायचे चेअरमन आर. एस. शर्मा यांच्या आधार हॅकिंग चॅलेंजच्या वादानंतर यूआयडीएआयने एक सूचना जारी केली आहे. या सूचनेनुसार, कुणीही आपला आधार क्रमांक सोशल मीडियावर शेअर करु नये, असे आवाहन आधार जारी करणाऱ्या प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

आधार क्रमांक जाहीरपणे शेअर करणे चुकीचे आहे. कायद्यानुसार तसे करुही नये. आधार एक विशिष्ट ओळख असून त्यावर विविध प्रकारचे फायदे, सबसिडी मिळते. इतरांच्या आधार क्रमांकाचा वापर करणे हे देखील गुन्हा आहे. असे केल्या आधारच्या कायद्यानुसार शिक्षेची तरतूद आहे, असे यूआयडीएआयने म्हटले आहे.