आदित्य ठाकरे यांच्या गाडीचा टायर फुटला, उद्या नशीब फुटेल – राधाकृष्ण विखे-पाटील

785

कोल्हापूर, दि. १ (पीसीबी) –  नाशिकला जात असताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गाडीचा टायर फुटला होता. हाच धागा पकडत आता टायर फुटला आहे, उद्या नशीब फुटल्याशिवाय राहणार नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे.  

कोल्हापुरातून काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला सुरूवात करण्यात आली. त्यासाठी विखे-पाटील कोल्हापुरात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, विखे –पाटील सातत्याने शिवसेनेवर टीका करत आले आहेत.  काही दिवसांपूर्वी नाशिकला जात असताना आदित्य ठाकरे यांच्या रेंज रोव्हर गाडीचा टायर फुटला होता. यावर   विखे -पाटलांनी भाषणात निशाणा साधला.  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे संघटनेवर नियंत्रण राहिलेले नाही. आदित्य यांच्या गाडीचा टायर फुटला. नियतीने दिलेला हा इशारा आहे, असे विखे-पाटील म्हणाले.