आदर्शनगर मध्ये भरदिवसा घरफोडी

56

देहूरोड, दि. २२ (पीसीबी) – घराला कुलूप लावून एका घरातील सर्व सदस्य सकाळी दहा वाजता वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला गेले. चोरट्यांनी त्या कुटुंबाच्या घरात घरफोडी करुन 65 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना आदर्शनगर, देहूरोड येथे रविवारी (दि. 20) दुपारी उघडकीस आली.

उत्तम नंदकुमार लोणकर (वय 33, रा. इंद्रा पार्क, आदर्शनगर, देहूरोड) यांनी सोमवारी (दि. 21) याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी दहा ते दुपारी एक वाजताच्या दरम्यान फिर्यादी लोणकर हे आपल्या घराला कुलूप लावून मित्राच्या वास्तूशांतीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्याने त्यांच्या दरवाजाचे लॅच लॉक कटावणीच्या साहाय्याने तोडले. घरातील कपाटातून एक लाख 65 हजार 500 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare