आत्महत्या सत्र सुरुच; मराठा आरक्षाच्या मागणीसाठी उस्मानाबादमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

179

उस्मानाबाद, दि. ६ (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात असलेल्या बरमाचीवाडी गावातील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली

महादेव मनोहर बाराखोते असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी महादेव बाराखोते या तरुणाचा बरमाचीवाडी या गावात झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच कळंब पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन महादेवची झडती घेतली असता त्याच्या खिशात एका चिठ्ठी सापडली. त्यामध्ये मराठा आरक्षण आणि यावर्षीही पावसाभावी शेतातील सोयाबीन वाळत चालले आहे. यामुळे नुकसान होणार असल्याने गळफास घेऊन आत्महत्या करत असल्याचे लिहले आहे. कळंब पोलिस अधिक तपास करत आहेत