आता आत्महत्येचे लोण पुणे जिल्ह्यात; पुरंदर तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

178

पुरंदर, दि. ३ (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभर आत्महत्येचे सत्र सुरु आहे. याचे लोण आता थेट पुणे जिल्हयापर्यंत पोहचले आहे. आज (शुक्रवार) सकाळी पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

दत्ताञय तुकाराम शिंदे (वय ३४, रा. पुरंदर, दौंडज खिंडी) असे रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील रेल्वे रुळावर एका तरुणाने जीव दिल्याची बातमी जेजुरी पोलिसांना मिळाली. यावर पोलिसांनी तातडीने घटना स्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी मयताचे खिशे तपासले असता त्याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत आपण मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्या करणार असल्याचा उल्लेख आहे. याप्रकरणी जेजुरी पोलीस पुढील तपास करत आहे.