आत्महत्या सत्र पुणे जिल्ह्यात; पुरंदर तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

67

पुरंदर, दि. ३ (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभर आत्महत्येचे सत्र सुरु आहे. याचे लोण आता थेट पुणे जिल्हयापर्यंत पोहचले आहे. आज (शुक्रवार) सकाळी पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.