आता ‘हा’ माणूस आपल्याला शिकवणार का? प्रणिती शिंदेंचा प्रकाश आंबेडकरांवर निशाणा

198

सोलापूर, दि. १५ (पीसीबी) –  अकोल्याच्या माणसाचे येथे सोलापुरात काय काम? तो माणूस आपल्याला शिकवणार का? असे करा,  तसे करा, अशा शब्दात  काँग्रेस आमदार  प्रणिती शिंदे यांनी  वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत प्रणिती शिंदे बोलत होत्या. दरम्यान, प्रकाश आंबेडकर अकोल्यासह सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. यामुळे शिंदे यांच्यासमोर आंबेडकर यांनी आव्हान उभे केले आहे.

या सभेत  प्रणिती शिंदे यांनी   प्रकाश आंबेडकर यांच्यावर  जोरदार  हल्ला चढवला.  भाजपची बी टीम असलेल्या वंचित बहुजन आघाडीला फक्त सांगितले गेले आहे की,  सोलापूरला जा आणि पेटवा. मग आपण त्यांच्या मागे जाणार आहोत काय? असा सवाल त्यांनी यावेळी केला.  दरम्यान,  शिंदे यांनी आंबेडकरांबरोबर भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यावरही  टीकास्त्र सोडले.