आता सरकार बदलण्याची वेळ आली आहे – राधाकृष्ण विखे-पाटील

139

लातूर, दि. १५ (पीसीबी) – देशात आणि राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. महागाई, इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांची आर्थिक ओढाताण होऊ लागली आहे. त्यामुळे आता हे सरकार बदलण्याची वेळ आली आहे, अशी टीका विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.

 

रेणापूर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी विखे-पाटील म्हणाले की, भाजप सरकारने दूध दराचा प्रश्न लोंबकळत ठेवला आहे. हमीभावावरून बाजार समित्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. इंधनाचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सर्व पातळीवर सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे आता या सरकारला बदलण्याची वेळ आली आहे.