आता शेतकऱ्यांनी भाजपला थारा देऊ नये – अजित पवार

134

बारामती, दि. ३ (पीसीबी) – देशाचे कृषीमंत्री राधामोहन सिंह शेतकऱ्यांच्या आंदोलनाची थट्टा करत आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी भाजपला थारा देऊ नये, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (रविवारी) येथे केले. बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळावा आणि सरपंच व नवनियुक्त सदस्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमप्रसंगी अजितदादा बोलत होते.  

यावेळी अजित पवार यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावरही टीकास्त्र सोडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. लोकमंगल संस्थेच्या माध्यमातून केलेला कर्ज घोटाळा, अग्निशमन केंद्राच्या जागेवर बेकायदा बंगला बांधणे,  याप्रकरणी सुभाष देशमुख यांनाही मंत्रिपदावरुन दूर झाले  पाहिजे, असे अजितदादा म्हणाले.

कोणताही घोटाळा उघड झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले जातात. मग सुभाष देशमुख यांनाच वेगळा न्याय का? असा सवाल अजित पवारांनी यावेळी उपस्थित केला.