आता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का ?

1297

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला  सत्ताधारी भाजपसह विरोधक लागले आहेत. विरोधकांनी भाजपविरोधात महाआघाडी तयार करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तर भाजपनेही सत्ता राखण्यासाठी घटक पक्षांची जुळवाजुळव सुरु केली आहे. राजकीय समीकरणे जुळवण्यास सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे.  दरम्यान, कार्वी इनसाईट्स आणि इंडिया टुडेच्या सर्व्हेनुसार आता लोकसभा निवडणूक झाल्यास एनडीए सत्ता राखण्यास यशस्वी होणार आहे. मात्र, भाजपला  घटक पक्षांच्या कुबड्यावरच   सत्ता आणता येणार आहे.

या सर्व्हेनुसार,  एनडीएला ३६ टक्के, यूपीएला ३१ टक्के तर  इतर पक्षांना ३३ टक्के  मते पडण्याची शक्यता वर्तवली आहे.  आत्ता निवडणूक झाल्यास लोकसभेच्या  एकूण ५४३ जागापैकी  एनडीएला २८१ (भाजप २४५)  यूपीएला १२२ (काँग्रेस ८३) इतरांना १४० जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यूपीएमध्ये एसपी + बसपा + तृणूल काँग्रेस आणि एनडीएमध्ये अण्णा द्रुमक  + वायएसआर  काँग्रेस यांची युती झाली तर काय होईल? एकूण जागा ५४३ पैकी एनडीएला २५५ (भाजप १९६) यूपीएला २४२ (काँग्रेस ९७) तर इतरांना ४६ जागा मिळतील.

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना ४८ टक्के नागरिकांनी पसंती दिली आहे.तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना  २७ टक्के नागरिकांनी पसंती दिली आहे. देशातील ९७ लोकसभा मतदारसंघांमध्ये १८ ते २९ जुलै या कालावधीत  मतदारांशी संवाद साधून हा सर्व्हे करण्यात आला आहे.

एनडीए – (एबीपी न्यूज सर्व्हे) २७४  (कार्वी-इंडिया टुडे सर्व्हे) २८१

यूपीए- (एबीपी न्यूज सर्व्हे) १६४ (कार्वी-इंडिया टुडे सर्वे) १२२

इतर – (एबीपी न्यूज सर्व्हे) १०५  (कार्वी-इंडिया टुडे सर्व्हे) १४०