आता मुस्लीम आरक्षणासाठी ९ सप्टेंबरला पुण्यात मोर्चा

236

पुणे, दि. ६ (पीसीबी) – मुस्लिम समाजाला दिलेले ५ टक्के आरक्षण कायम ठेवून त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच मुस्लिम समाजाला अॅट्रॉसिटी कायद्याचे सरंक्षण द्यावे. यांसह अनेक मागण्यांसाठी पुण्यात ९ सप्टेंबरला गोळीबार मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयादरम्यान शांततेत मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती सिमरन कुरेशी यांनी आज (सोमवार) पुण्यात पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी नगरसेवक गफूर पठाण, अंजुम इनामदार, राहुल डंबाळे आणि अल्ताफ शेख आदी उपस्थित होते.

कुरेशी म्हणाले की, निवडणुकीच्या काळात राजकीय नेत्यांना मुस्लिम समाजाची आठवण होते. निवडणुका झाल्यावर या समाजाला वाऱ्यावर सोडले जाते. त्यामुळे मुस्लिम समाजातील तरुण-तरुणींना अन्यायाला सामोरे जावे लागत आहे. यावर कोणताही नेता बोलण्यास तयार नाही. या सर्व परिस्थितीला लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. त्यांनी योग्य धोरण तयार करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.