आता मराठी आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणीची आत्महत्या

259

उस्मानाबाद, दि. २ (पीसीबी) –  आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा तरूण जीव देत असताना आता तरूणीनेही मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

तृष्णा तानाजी माने (वय १९, रा. कळंब, देवळाली) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यातील देवळाली येथे तृष्णाने दोन दिवसांपूर्वी आरक्षणाच्या मागणीसाठी विषारी द्रव्‍याचे सेवन केले होते. दोन दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र बुधवारी (दि.१) सायंकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू  झाला. आज (गुरूवार) दुपारी एकच्या सुमारास तिच्यावर अंतीम संस्कार करण्यात आले.

दरम्यान,  मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने शिकूनही उपयोग नाही, असे सांगत तृष्णाने हे पाऊल उचलले, असे तृष्णाच्या वडीलांनी सांगितले आहे.