आता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून  बेमुदत चक्री उपोषण  

162

पुणे, दि. १८ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २० ऑगस्टपासून मराठा समाजाच्या वतीने  बेमुदत चक्री उपोषण सुरू करण्यात येणार  आहे, अशी घोषणा आज  (शनिवार) पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली.

९ ऑगस्टला  आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी काही ठिकाणी हिंसाचार झाला होता. त्यामुळे यापुढचे आंदोलन रस्त्यावर होणार नाही, अशी घोषणा याआधीच करण्यात आली होती. आता मराठा बांधवांनी आरक्षण आणि इतर सर्व प्रमुख मागण्यांसाठी चक्री उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे, असे यावेळी सांगण्यात आले.