आता भाजपचे ६० ते ७० आमदारच निवडून येतील – जयंत पाटील   

792

सातारा, दि. १४ (पीसीबी) – गेल्या ६० वर्षात देशातील दुर्बल घटकांना आघाडी सरकारने संरक्षण देण्याचे काम केले आहे. मात्र, भाजप सरकारच्या काळात या घटकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. या देशात पुन्हा एकदा मनुवाद आणण्याची भाजपची मानसिकता दिसून येत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. तसेच भाजपचे महाराष्ट्रात १२२ आमदार आहेत. मात्र, आगामी निवडणुकीत भाजपचे ६० ते ७० आमदारच निवडून येऊ शकतात, असा दावाही पाटील यांनी यावेळी केला.

जयंत पाटील साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनात आले होते. यावेळी त्यांनी बुथ बांधणीचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पाटील म्हणाले की, मोदींच्या खोट्या आश्‍वासनाची शहरी मतदारांना भुरळ पडली होती. मात्र, तोच मतदार आता त्यांच्यापासून दूरावत चालला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा विधानसभा व लोकसभा निवडणुकीत आमचे इतके तितके आमदार निवडून येणार, असे सांगत सुटले आहेत. त्यांचेच सरकार केंद्रात व राज्यात असताना त्यांना हे सांगत बसण्याची काय गरज आहे. राज्यातील वातावरण त्यांच्या विरोधात जात आहे.