आता प्रणवदांची भाजपच्या कार्यक्रमाला हजेरी

101

चंदीगढ, दि. २ (पीसीबी) – हरयाणात भाजप सरकारच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज (रविवार)  उपस्थिती लावली. यापूर्वी प्रणवदांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात उपस्थिती लावल्याने टीकेची झोड उठविण्यात आली होती. आता तर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासोबत प्रणवदा व्यासपीठावर होते. त्यामुळे पुन्हा एकदा मुखर्जी वादात अडकण्याची शक्यता आहे. 

काही महिन्यांपूर्वी नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जींनी उपस्थिती लावली होती. त्यापूर्वी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रणवदांना कार्यक्रमात न जाण्याचा सल्ला दिला होता. त्यावरून काँग्रेस – भाजपमध्ये चांगलाच वादंग माजला होता.

या वादाला काही महिने उलटत नाही तोच प्रणव मुखर्जी यांनी आता भाजपच्या कार्यक्रमाला  हजेरी लावली. प्रणव मुखर्जी फाउंडेशनच्या अनेक कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यासाठी मुखर्जी हे मुख्यमंत्री खट्टर यांच्यासोबत एका मंचावर एकत्र आले. मुखर्जी यांनी या कार्यक्रमासाठी १५ वरिष्ट आणि काही ज्यूनिअर पातळीवरील आरएसएसच्या कार्यकर्त्यांना आमंत्रण दिले होते.