आता गोडसेंना भारतरत्न देण्याची शिफारस केली जाईल – असदुद्दीन ओवैसी

92

हैद्राबाद, दि. १८ (पीसीबी) – भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसे याला देशभक्त म्हटल्याने मोठे वादंग उठले आहे. यात आता  एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी उडी घेतली आहे. पुढील काही वर्षात  गोडसे यांना भारतरत्न देण्याची शिफारस केली जाईल, असे म्हणत ओवैसी यांनी  भाजप आणि प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रज्ञासिंह ठाकूरच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. ठाकूर यांचे ते वैयक्तिक मत नाही, असे म्हणत त्यांनी भाजप स्वतंत्र भारतातील पहिल्या दहशतवाद्यासोबत आहे, असेही ओवैसी यांनी  म्हटले आहे.

दरम्यान, साध्वीने गांधी आणि नथूराम गोडसे यांच्याबद्दल केलेले  विधान निंदनीय आहे. गांधींजींबद्दल वक्तव्य करणाऱ्यांना मी कधी माफ करू शकणार नाही, असे मोदी यांनी म्हटले होते. साध्वी यांनी गोडसे यांना देशभक्त म्हटल्याने विरोधकांकडून भाजप आणि साध्वीवर टीकेची झोड उठवली जात आहे.