“…आणि सोसायटीच्या पार्किंग मधून दुचाकी चोरीला”

78

चिंचवडगाव, दि. २७ (पीसीबी) – सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 25) सकाळी वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे उघडकीस आली.

पुरु महेश गावडे (वय 23, रा. लक्ष्मी कॉम्प्लेक्स, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची एक लाख पाच हजार रुपये किमतीची दुचाकी हॅण्डल लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहन चोरीचा हा प्रकार रविवारी (दि. 24) सायंकाळी पाच ते सोमवारी (दि. 25) सकाळी सात या कालावधीत घडला.

WhatsAppShare