‘…आणि याच कारणामुळे शरद पवारांनी अचानक पत्रकार परिषद घेतली’

108

मुंबई, दि.२७ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पत्रकार परिषद घेत आहेत. राज्यातील तुफान पावसाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार संवाद साधत आहेत. राज्यात आलेल्या महापुराने शरद पवार चिंतातूर आहेत. महापूर आणि दरडी कोसळल्याचं चित्र पाहून शरद पवार गेल्या दोन दिवसांपासून अस्वस्थ असल्याची माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार संवाद साधत आहेत.

राज्याला पुराचा मोठा फटका बसला. या पुरामुळे घरांचं, शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. राज्यात सात आठ जिल्यात पूरस्थिती आहे. कोकणात घरांचं नुकसान झालंय. इतर ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय. माती वाहून गेली. सहा जिल्ह्यांमध्ये अधिक नुकसान झालं आहे. राज्य सरकार त्यांच्या कार्यक्रमानुसार मदत करेल. काही तातडीची मदत राज्य सरकारकडून मिळणार आहे. आढाव्यानंतर राज्य सरकार आणखी मदत जाहीर करेल अशी खात्री आहे.

दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात माळीण गावात अशीच परिस्थिती झाली होती. त्यावेळी सरकार आणि जनतेच्या मदतीने गाव पुन्हा उभं केलं. पुनर्वसन कसं करतात त्याचं उदाहरण आहे. शरद पवार राज्यावर आलेल्या पूर परिस्थितीवर भाष्य केलं. राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये आलेल्या पूरामुळे शेतकरी, कष्टकरी, उद्योजकांचं मोठं नुकसान झालंय आहे. त्यामुळे या भागात स्वत: शरद पवार जाण्याची शक्यता आहे. पूरग्रस्त भागांचा ते आढावा घेऊ शकतात. दरड कोसळणे, त्यासोबत ओल्या दुष्काळातून बाहेर कसे पडावे यासाठीही ते सरकारला काही महत्वाच्या बाबी सूचवण्याची शक्यता आहे. राज्यासाठी केंद्राकडून भरीव मदद मिळण्यासंदर्भातही ते भाष्य करण्याची शक्यता आहे.

WhatsAppShare