‘…आणि मृतदेह रेल्वेतून गायब झाला आणि १२ तासांनी जे काही समोर आलं ते धक्कादायक होत’

102

मुंबई, दि.१५ (पीसीबी) : मुंबई-वाराणसी विशेष रेल्वेमधील मृतदेह गायब झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र बारा तासांनी हा मृतदेह मध्य प्रदेशातील स्टेशनजवळ सापडल्याची माहिती आहे. गार्डच्या कम्पार्टमेंटमधून मृतदेह गायब झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. मृतदेह मुंबईहून प्रयागराजला नेला जात असताना हा प्रकार घडला. गार्डच्या कम्पार्टमेंटमध्ये शवपेटीत ठेवलेला मृतदेह गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. तब्बल 12 तासांच्या कालावधीनंतर 200 किमी दूर मध्य प्रदेशातील स्टेशनजवळ मृतदेह सापडला.लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन गाडी नंबर 2117 लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसीतून मृतदेह नेण्यासाठी बुकिंग करण्यात आले होते. मात्र गार्डच्या कम्पार्टमेंटमधून अचानक डेड बॉडी गायब झाल्याचं त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आलं. त्यानंतर जीआरपी आणि आरपीएफ यांना सांगण्यात आलं. शोधाशोध केल्यानंतर संबंधित मृतदेह मध्य प्रदेशातील मेहर रेल्वे स्टेशनवर असल्याचं बारा तासांनी जीआरपीला माहित झालं. त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबाला हा मृतदेह सुपूर्द करण्यात आला. नेमकं काय झालं, याविषयी पुढचा तपास रेल्वे करत आहे. याआधी, वसईच्या भुईगाव समुद्रकिनारी एका सुटकेसमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. या महिलेची हत्या करुन, मुंडकं धडापासून वेगळं करून तो मृतदेह सुटकेसमध्ये भरुन समुद्रात फेकलेला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. वसईच्या भुईगाव समुद्र किनारी 26 जुलै रोजी दुपारी हा मृतदेह मिळाला होता. सुटकेसमध्ये मृतदेह कुजलेल्या स्थितीत असून मृतदेहाच्या अंगात ड्रेस घातलेला होता.

दरम्यान, मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या 30 वर्षांच्या महिलेचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना 11 जुलैला उघडकीस आली होती. वसईच्या किल्ला बंदर समुद्र किनाऱ्यावर ममता पटेल हिचा मृतदेह सापडला होता. ती चार दिवसांपासून बेपत्ता होती. ममता पटेल वसईच्या एव्हरशाईन परिसरात राहत होती. ती मूळ गुजरातमधील नवसारी येथील रहिवासी होती. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी तिचा विवाह झाला होता.

WhatsAppShare