आणि ‘त्या’ डंपरच्या धडकेत सायकलस्वाराला जीव गमवावा लागला

56

पिंपरी, दि.१७ (पीसीबी ) : एका सायकलस्वार व्यक्तीला कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरने धडक दिली. या अपघातात सायकलवरील व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना 4 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी सव्वाआठ वाजता विश्वेश्वर चौक, एमआयडीसी भोसरी येथे घडली. याबाबत 16 जुलै 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमंत गुरूबाळप्पा हडपद (वय 53) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत उमेश हनुमंत हडपद (वय 25, रा. रहाटणी, काळेवाडी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कचरा वाहतूक करणाऱ्या डंपर (एम एच 04 / सी यु 8302) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मयत वडील हनुमंत त्यांच्या सायकलवरून 4 नोव्हेंबर रोजी कामावर जात होते. ते सकाळी सव्वाआठ वाजता एमआयडीसी भोसरी मधील विश्वेश्वर चौकात आले असता कचरा वाहतूक करणाऱ्या एका डंपरने हनुमंत यांच्या सायकलला धडक दिली. त्यामध्ये हनुमंत यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

WhatsAppShare