‘…आणि ‘त्या’ कॉलनीमध्ये भर दिवसा झाली घरफोडी’

58

वाकड, दि. १४ (पीसीबी) – रहाटणी मधील राजगड कॉलनी येथे अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी केली. घरातून दागिने आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख सहा हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन वाजताच्या कालावधीत घडली.

स्टॅनली अॅनथोनी नरोगा (वय 42, रा. राजगड कॉलनी, रहाटणी) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर मंगळवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले पिवळ्या धातूचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख सहा हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare