‘… आणि तेव्हा कुठे हि धक्कादायक बाब घरच्यांच्या लक्षात आली’

98

भोसरी, दि.३ (पीसीबी) – रात्रीच्या वेळी कडी न लावता पुढे केलेल्या दरवाजातून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही घटना 30 एप्रिल रोजी रात्री खंडोबामाळ भोसरी येथे घडली.

शिवदास माधव ठाकूर (वय 27, रा. खंडोबामाळ भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी घरात झोपलेल्या असताना रात्री उशिरा त्यांचा मेहुणा घरी आला. त्यानंतर तो जवळच असलेल्या किराणा दुकानात रात्री साडेअकरा वाजता झोपण्यासाठी गेला. जाताना त्याने दरवाजा लोटून घेतला आणि कडी लावण्यास सांगितले. मात्र झोपेच्या भरात फिर्यादी यांनी कडी लावली नाही. दरम्यान रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्या दरवाजातून घरात प्रवेश करून घरातून 28 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare