‘…आणि तलाठी ३० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला गेला’

84

पुणे, दि.२७ (पीसीबी) : मृत्यूपत्राची आणि हक्कसोडपत्राची नोंद सातबा-यावर घेण्यासाठी 30 हजाराची लाच स्विकारणा-या चऱ्होली बुद्रुक (ता. हवेली) येथील तलाठ्याला पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. सोमवारी (दि. 27) दुपारी एसीबीने ही कारवाई केली आहे. मारुती अंकुश पवार (वय 41) असे पकडलेल्या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्याजवळील मृत्युपत्राची व हक्कसोडपत्राची नोंद सातबारा सदरी घेण्यासाठी अर्ज केला होता. त्यावेळी तलाठी मारूती पवार याने 50 हजार रुपयांची लाच मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती 30 हजार रुपयांचा व्यवहार ठरला होता. याबाबत एसीबीकडे तक्रार दिली होती. त्यानुसार त्याची पडताळणी करून सोमवारी दुपारी सापळा रचून 30 हजाराची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले आहे.

WhatsAppShare