…आणि चोरटयांनी अगदी 25 मिनिटात पळवले दोन लॅपटॉप

12

आकुर्डी, दि. २२ (पीसीबी) – अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून घरातून 38 हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 21) आकुर्डी सेक्टर क्रमांक 26 मधील साळुंखे मॅटर्निटी होम येथे सकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास अवघ्या 25 मिनिटात घडली.

अनिकेत श्रीनिवास केतकर (वय 26, रा. साळुंखे मॅटर्निटी होम, आकुर्डी, सेक्टर क्रमांक 26) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा सोमवारी सकाळी उघडा होता. सकाळी सहा वाजून 50 मिनिटांपासून ते सव्वासात वाजेपर्यंतच्या 25 मिनिटांच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश केला. दरवाजा जवळ एका स्टूलवर ठेवलेले 38 हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare