‘….आणि उघड्या दरवाजावाटे मोबाईल फोन चोरीला’

43

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – घराच्या उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातून तीन मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 17) पहाटे साडेपाच वाजता नारायण खंडू काळभोर चाळ, काळभोर नगर, चिंचवड येथे घडली.

आनंद नारायण आटोळे (रा नारायण खंडू काळभोर चाळ, काळभोर नगर, चिंचवड) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. त्यावेळी उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून सॅमसंग आणि अॅपल कंपनीचे 59 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare