आणखी सहाजण हिट लिस्टवर; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड

726

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीबीआयने आणखी सहा जण हिंदुत्ववादी संघटनांच्या निशाण्यावर असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी अमोल काळेच्या डायरीतून सहा जणांची नावे समोर आली आहेत. त्यात चार जण ठाण्यातील, एक उत्तर प्रदेशातील आणि एका नावाचा उल्लेख मुंबई एसपी असा आहे.

सीबीआय सूत्रांच्या माहितीनुसार, ‘मुंबई एसपी’ म्हणजे एसपी नंदकुमार नायर हे असू शकतात. यापूर्वीही ते हिंदुत्त्वादी संघटनेच्या निशाण्यावर असल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे, नंदकुमार नायर यांनीच दाभोलकर हत्या प्रकरणात वीरेंद्र तावडे याला पहिल्यांदा अटक केली होती. तेव्हापासूनच हिंदूत्त्ववादी संघटना नायर यांना टार्गेट करत आहे. अमोल काळे आणि वीरेंद्र तावडे हे दोघे दाभोलकरांच्या हत्येमागील मास्टरमाइंड असल्याचा संशय सीबीआयला आहे.