आठ पोलिसांचा खुनी विकास दुबेला अखेर बेड्या

37

उजैन, दि. ९ (पीसीबी) – उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार मुख्य आरोपी विकास दुबे याला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन येथून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. २ जुलै रोजी कानपूर येथे अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर कुख्यात गुंड विकास दुबे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून विकास दुबे फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी त्याच्यावर पाच लाखांचं बक्षिसही जाहीर केलं होतं. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.

उज्जैनचे जिल्हाधिकारी आशिष सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, “विकास दुबे महाकाल मंदिरात जात असताना एका सुरक्षा रक्षकाने त्याला ओळखलं आणि पोलिसांना माहिती दिली. चौकशी केली असता त्याने आपली ओळख उघड केली. पोलिसांनी त्याला अटक केली असून चौकशी सुरु आहे”.

WhatsAppShare