आठवलेंनी शिवसेनेचं टेन्शन घेऊ नये- संजय राऊत

184

नवी दिल्ली,दि.१९ (पीसीबी)-भाजप-शिवसेनेची युती व्हावी व त्यांनी सरकार स्थापन करावं. यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक नवा फॉर्म्युला सुचवला आहे. यावरच शिवसेना नेते संजय राऊतांनी टीका केली आहे.

रामदास आठवले हे केंद्रात राज्यमंत्री आहेत. त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद कसं मिळेल हे पाहावे . रामदास आठवलेंनी शिवसेनेचं टेन्शन घेऊ नये, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपला तीन वर्ष मुख्यमंत्रिपद तर शिवसेनेला दोन वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याच्या फाॅर्म्युल्यावर चर्चा करण्यासाठी राऊत तयार झाले आहेत, असं वक्तव्य आठवलेंनी केलं होतं. याचाच समाचार घेत राऊतांनी आठवलेंवर निशाणा साधला आहे.

WhatsAppShare