आठवडाभर पावसाचा जोर कायम राहणार – हवामान विभाग

71

मुंबई, दि.५ (पीसीबी) – मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. मुंबईतल्या दादर, लालबाग, परळ, वांद्रे, मुंलुंड, कांजूरमार्ग, पवई, अंधेरी भागात जोरदार पाऊस बरसत आहे. पहाटेपासून पाऊस इतका जोरदार बरसतोय, की दृश्यतामान कमी होत असल्यामुळे रेल्वे आणि रस्त्यावरील वाहनांचा वेग मंदावलेल्या आहे.

दरम्यान, या आठवड्यात सुरुवातीपासून जोर धरलेला पाऊस पूर्ण आठवडा असाच बरसत राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. सोमवारी पावसाने सुरु केलेली बॅटींग सुरूच आहे. हवामान खात्याचे तज्ज्ञ अजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार मान्सून या आठवड्यात सक्रीय राहणार असून, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.