आज तितकेच दु:ख झाले आहे, जितके वडिलांच्या निधनावेळी झाले होते – लता मंगेशकर

124

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – ‘अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर माझ्यावर जणू डोंगरच कोसळला आहे. मी त्यांना वडिलांच्या जागी मानत होते, आणि त्यांनीही मला मुलीचे स्थान दिले होते. मला ते इतके प्रिय होते की मी त्यांना दादा म्हणायचे. आज मला तेवढंच दु:ख झाले आहे, जितके माझ्या वडिलांच्या निधनावेळी झाले होते. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो’, अशा शब्दांत गानसम्राजी लता मंगेशकर यांनी  ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहली आहे. 

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (वय ९३) यांचे  आज (गुरूवार) सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वाजपेयी यांच्यावर  ११ जूनपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.  अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव शुक्रवारी (दि.१७) सकाळी ६ ते ९ या वेळेत त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.