आचार्य तुषार भोसले आदिवासींसोबत साजरी करणार अटल-गीता जयंती

0

धुळे जिल्ह्यातील धर्मांतरण सुरु असलेल्या आदिवासी पाड्यांवर जाऊन सांगणार गीतेचे तत्वज्ञान

धुळे, दि.२३ (पीसीबी) : डिसेंबर २०२० रोजी भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी जी यांची जयंती आहे. मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला श्रीमद्भगवदगीता जयंती असते. यावर्षी हे दोन्ही योग एकाच दिवशी जुळून आल्याने दि. २५ डिसेंबर रोजी भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी अटल-गीता जयंती साजरी करणार आहे.

यानिमित्ताने राज्यभरात अनेक ठिकाणी सामुदायिक गीता पठण तसेच “गीता” भेट देण्याचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले धुळे जिल्ह्यातील धर्मांतरण सुरु असलेल्या आदिवासी पाड्यांवर जाऊन “अटल-गीता जयंती” साजरी करणार आहेत. या ठिकाणी आदिवासींमध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशा आदिवासी बांधवांची भेट घेऊन त्यांना ते हिंदु धर्माचा पवित्र गीता ग्रंथ भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

WhatsAppShare