आचारसंहिता लागू होताच महापौरांनी केले सरकारी वाहन जमा

346

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत जाहीर केले. २१ ऑक्टोबरला होणाऱ्या मतदानासाठी आजपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली  असून राज्यातील २८८ मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याने मतदार २१ ऑक्टोबर रोजी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

आदर्श आचारसंहिता लागू होताच पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांनी आपले सरकारी वाहन जमा करून रिक्षाने घरी जाणे पसंत केले. निवडणूक आचारसंहिता संपेपर्यंत सरकारी वाहन वापरण्यावर निर्बंध आहेत.

WhatsAppShare