आघाडी करताना तंगड्यात तंगडं घातल्याने ‘ते’ नक्कीच पडणार – उध्दव ठाकरे

201

औरंगाबाद, दि. १७ (पीसीबी) – काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करताना हातात हात घालून त्यांनी तंगड्यात तंगडं घातले आहे, त्यामुळे ते नक्कीच पडणार, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) येथे विरोधकांना लगावला.

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे शिवसेना-भाजप युतीचा  संयुक्त मेळावा झाला. यावेळी  ठाकरे बोलत होते.

ठाकरे म्हणाले की,  शिवसेनाप्रमुखांनी नेहमीच मला गोरगरीबांच्या मुलांची पहिल्यांदा काळजी घ्यायला हवी, त्यांचे लाड करायला हवेत, असेच शिकवले आहे. तसेच राधाकृष्ण विखेपाटील म्हणाले होते की, ईडीच्या भीतीने यांनी युती केली. मात्र, ईडीची भीती आम्हाला नाही, तर तुम्हाला आहे. या ईडापिडा तुमच्याकडे आहेत आमच्याकडे नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.

WhatsAppShare