आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप ‘टी-२०’चा फॉर्म्युला वापरणार

125

नवी दिल्ली,  दि. १६ (पीसीबी) – आगामी  लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने  पुन्हा सत्तेत येण्यासाठी ‘टी-२०’ फॉर्म्युला तयार केला आहे. हा ‘टी-२०’ फॉर्म्युला म्हणजे  २०-२० म्हणजे २० घरं! यानुसार प्रत्येक कार्यकर्त्याला २० घरांचे लक्ष्य दिले आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने त्याच्या परिसरातील २० घरांपर्यंत पोहोचायचे आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेली कामे, चहा घेता घेता, त्या घरातल्या लोकांपर्यंत पोहोचवायची,असे भाजप नेत्याने सांगितले. 

प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी ‘घर-घर दस्तक’, हर बुध दस युथ, बुथ टोली हे प्रचारतंत्र चालवण्यात येणार आहे. भाजप २०१९ साठी नमो अॅपचा देखील वापर करणार आहे. लवकरच या अॅपचे अद्ययावत व्हर्जन येणार आहे. यात कार्यकर्त्यांना देणाऱ्या येणाऱ्या कामांची सूचना असेल. व्हिडिओ आणि ग्राफिक्सचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. यात एका पोलिंग बुथशी किमान १०० लोकांना जोडण्याचे लक्ष्य ठेवले आहे.