आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप ‘टी-२०’चा फॉर्म्युला वापरणार

26

नवी दिल्ली,  दि. १६ (पीसीबी) – आगामी  लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने  पुन्हा सत्तेत येण्यासाठी ‘टी-२०’ फॉर्म्युला तयार केला आहे. हा ‘टी-२०’ फॉर्म्युला म्हणजे  २०-२० म्हणजे २० घरं! यानुसार प्रत्येक कार्यकर्त्याला २० घरांचे लक्ष्य दिले आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने त्याच्या परिसरातील २० घरांपर्यंत पोहोचायचे आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेली कामे, चहा घेता घेता, त्या घरातल्या लोकांपर्यंत पोहोचवायची, असे भाजप नेत्याने सांगितले.