आखेर राष्ट्रवादीचे नगरसेवक दिपक मानकर सहाय्यक आयुक्तांसमोर हजर

588

पुणे, दि. १ (पीसीबी) – सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक दिपक मानकरांवर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातून जामिन मिळण्यासाठी मानकर यांनी सर्वोच न्यायालयाकडे जामिन अर्ज केला होता. मात्र सर्वोच न्यायालयाने त्यांचा जामिन अर्ज फेटाळून दहा दिवसांच्या आत पोलिसांना शरण येण्याचे आदेश दिले होते. यावर आज (बुधवार) सकाळी मानकर हे लष्कर विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांसमोर हजर झाले आहेत.

मानकरांनी  मुंबई उच्च न्यायालयात जामिन अर्ज सादर केला होता. मात्र बऱ्याच खंडपीठांनी त्यावर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. यामुळे मानकर यांनी सर्वोच न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच न्यायालयाने त्यांचा जामिन अर्ज फेटाळून दहा दिवसांच्या आत पोलिसांना शरण येण्याचे आदेश दिले होते. यावर राष्ट्रवादीचे नगरसेवक दिपक मानकर हे आज आखेर पोलिसांना शरण आले आहेत. त्यांना आज शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.