आक्या बॉन्ड़ टोळीकडून वाहनांची तोडफोड

253

पिंपरी, दि. 30 (पीसीबी) : अनिकेत रणदिवे यांच्या खुनामुळे संतापलेल्या आक्या बॉन्ड टोळीने घरकुल (चिखली) परिसरात वाहनांची तोडफोड केली. ही घटना शनिवारी (दि. ३०) दुपारी घडली. अक्या बॉन्ड़ आणि अमित चव्हाण टोळी यांच्यात घरकुल परिसरातील वर्चस्वावरून वाद आहेत. याच वादातून 15 मे रोजीची अमित चव्हाण याच्यावर खुनी हल्ला झाला. या खुनी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आक्या बॉन्ड टोळीतील अनिकेत रणदिवे यांचा शुक्रवारी (दि. 29) चव्हाण टोळीकडून खून करण्यात आला.
अनिकेत रणदिवे याच्या खूनामुळे संतापलेल्या आक्या बॉन्ड टोळीने आरोपी राहात असलेल्या घरकुल चिखली येथील इमारतीच्या परिसरातील वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. घरकुल परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे घरकुल परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

WhatsAppShare