आकुर्डीत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलेची सोनसाखळी हिसकावली

88

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या एका महिलेची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकामारून चोरून नेली. ही घटना आज (सोमवारी) सकाळी सहाच्या सुमारास आकुर्डी येथील बजाज कंपनी समोरील रस्त्यावर घडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

आकुर्डी येथील बजाज कंपनी समोरील रस्त्यावरून एका महिला मॉर्निंग वॉकसाठी जात होती. यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली. सोनसाखळी हिसकावल्यानंतर ही महिला रस्त्यावर पडली. ही महिला तोंडावर पडून काही अंतर फरफटत गेल्याचे चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

सोनसाखळी चोरट्याने अंगामध्ये काळ्या रंगाचे जाकेट आणि निळ्या रंगाची जिन्स पँट घातली होती. सकाळी या रस्त्यावर वर्दळ असताना देखील चोरट्यांनी महिलेची सोनसाखळी चोरून नेली.