आकुर्डीत मंगळवारी मोफत रक्तदान शिबीराचे आयोजन

92

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – कै. सुमित जाधव सोशल फांऊडेशनच्या वतीने आकुर्डीगावतील मारूती मंदिर येथे उद्या (मंगळवारी) मोफत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे रक्तदान करणाऱ्यांस मोफत विमा काढण्यात येणार आहे. यात अॅक्सिडेन्ट साठी १ लाखापर्यंत तर मेडिक्लेम साठी ५० हजारापर्यंत विमा देण्यात येणार आहे. ही रक्तदान शिबीर सकाळी ९ ते सायंकाळी ६ च्या दरम्यान होणार आहे. या शिबीरास प्रमुख पाहूणे म्हणून माजी महापौर आझमभाई पानसरे, आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, आमदार महेशदादा लांगडे, कामगार नेते इरफान सय्यद, पवना सहकारी बँकेचे संचालक तुकाराम नाना काळभोर, खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष व्ही. एस. काळभोर, नगरसेवक शंकर पांढरकर आदी उपस्थित राहणार आहेत.