आकुर्डीत दोन दुचाकींचा अपघात; एकजण गंभीर जखमी

453

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – भरधाव येणाऱ्या एका दुचाकीने युटर्न घेणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि.२७) सकाळी दहाच्या सुमारास आकुर्डी येथील पंचकर्म क्लिनिक समोर झाला.

अंकुश लक्ष्मण जाधव (वय ४९, रा. जाधव पार्क, शंकर मंदिराजवळ, आकुर्डी) असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे वडिल लक्ष्मण जाधव (वय ७०, रा. आकुर्डी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात (एमएच/१२/टिसी/७७७) या दुचाकीवरील अज्ञात इसमाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मण जाधव यांचा मुलगा अंकुश हा सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास आकुर्डी येथील पंचकर्म क्लिनिक समोर त्यांची दुचाकी (क्र.एमएच/१४/सीएफ/६) वरुन युटर्न घेत होते. यावेळी भरधाव वेघाने आलेली दुचाकी (क्र.एमएच/१२/टिसी/७७७) वरील अज्ञात इसमाने अंकुश याच्या दुचाकीला जोरदार धडक देऊन फरार झाला. या अपघातात अंकुश हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. चिंचवड पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.