आकुर्डीत गुरुवारी भव्य इनामी कुस्त्यांचा जंगी आखाडा

164

आकुर्डी, दि.३१ (पीसीबी) – आकुर्डी गावचे ग्रामदैवत श्री खंडोबा यांचा धार्मिक उत्सव बुधवार व गुरुवारी होणार आहे. उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच कुस्ती शौकिनांसाठी आकुर्डी गावातील वसंतदादा पाटील मराठी शाळेच्या पटांगणावर दुपारी ३ वाजता भव्य इनामी कुस्त्यांचा जंगी आखाडा भरणार आहे. कुस्ती शौकिनांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.

       कुस्त्यांच्या लढतीमध्ये पै. प्रसाद सस्ते (मामासाहेब मोहोळ कस्ती संकुल कात्रज महाराष्ट्र चॅम्पियन ज्ञानेश्वर मांगडे यांचा पठ्ठा) विरुध्द पै. अक्षय गरुड (गोकुळ उस्ताद तालिम उपमहाराष्ट्र केसरी संतोष गरुड यांचा पठ्ठा) आणि पै. सागर मोहोळ (खालकर तालीम उपमहाराष्ट्र केसरी राजेंद्र मोहोळ यांचा पठ्ठा) विरुध्द पै. उत्तम विर (गोकुळ उस्ताद तालीम उपमहाराष्ट्र केसरी संतोष गरुड यांचा पठ्ठा) या मुख्य लढती होणार आहेत. तसेच पै. चेतन कंदोरे विरुध्द पै. सचिन पाटील; पै. राजु तांगडे विरुध्द पै. संकेत चव्हाण या कुस्त्यांदेखील आघाड्याचे मुख्य आकर्षण ठरतील. युवा महाराष्ट्र केसरी, एनआयएस कुस्ती कोच पै. किशोर हिरामण नखाते यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. प्रसिध्द कुस्ती निवेदक हंगेश्वर धायगुडे, कोल्हापुरचे प्रसिध्द हलगी सम्राट बापू आवळे हे सेवा देणार आहेत. कै. शंकर विष्णू कुटे यांच्या स्मरणार्थ कैलास गणपत कुटे यांच्याकडून चांदीची गदा, दिलीप खंडू पांढरकर व हर्षवर्धन दिलीप पांढरकर यांच्याकडून रोख ५१ हजार रुपयांचे बक्षिस, कै. पै. सोपान विष्णू काळभोर यांच्या स्मरणार्थ सोमनाथ सोपानराव काळभोर यांच्या चांदीची गदा, पै. ज्ञानेश्वर किसनराव कुटे आणि पै. विजय मारुतीराव कुटे यांच्याकडून रोख १५ हजार रुपये, माजी नगरसेवक गोपाळ नाना कुटे यांच्याकडून ११ हजार रुपये व तीन स्मृतीचिन्ह, कै. नारायण हरीभाऊ काळभोर यांच्या स्मरणार्थ पै. सुनिल नारायण काळभोर यांच्याकडून रोख ११,१११ रुपये, कै. खंडू सावळेराम काळभोर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री. खंडेराया काळभोर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रोख ११ हजार रुपये, कै. दगडूशेठ शंकरराव दातीर पाटील यांच्या स्मरणार्थ दिलीप दगडूशेठ दातीर पाटील यांच्याकडून रोख ११ हजार रुपये व स्मृतीचिन्ह, कै. बबनराव बळवंत काळभोर यांच्या स्मरणार्थ मनिष बबनराव काळभोर यांच्याकडून रोख ११ हजार रुपये, माजी नगरसेवक निलेश शंकरराव पांढरकर आणि रामभाऊ खंडू पांढरकर, सचिन किसन पांढरकर यांच्याकडून रोख ११ हजार रुपये, कै. जयवंत भिवाजी काळभोर यांच्या स्मरणार्थ राहुल साहेबराव काळभोर यांच्याकडून रोख १० हजार रुपये, सामाजिक कार्यकर्ते उत्तम मारुतीराव कुटे, तुळशीराम (नाना) त्रिंबक काळभोर, पै. राजू बाजीराव काळभोर आणि पै. उत्तम रामदास काळभोर, विष्णू तात्या पांढरकर यांच्याकडून रोख १० हजार रुपये तसेच पै. संभाजी श्रीपती काळभोर आणि पै. मल्हारी श्रीपती काळभोर, सामाजिक कार्यकर्ते पै. किसन तात्या काळभोर, अभिनव प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सचिन ज्ञानेश्वर काळभोर, उद्योजक अशोक गणपत कदम, खंडोबा उत्सव समितीचे अध्यक्ष पंढरी गणपत थरकुडे आणि रामभाऊ दातीर पाटील, पै. विनायक मारुती वायकर, किशोर मधूकर जाधव आणि मंगेश रोहिदास कुटे तसेच प्रविण गोविद कुटे यांच्याकडून ५ हजार रोख व स्मृतिचिन्ह अशी बक्षिसांची खैरात विजेत्यांवर केली जाणार आहे.

     मुख्य लढतींबरोबरच इतर पन्नासहून जास्त कुस्त्या यावेळी होणार आहेत. अशी माहिती ट्रस्टच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.