आकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार

4132

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – लग्नाचे आमिष दाखवून आणि मारहाण करुन आकुर्डीतील एका २३ वर्षीय तरुणीला शिरगावातील भक्त निवास येथे नेवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना २०१५ ते जुलै २०१८ दरम्यान शिरगाव येथील साई प्रज्ञा भक्त निवास येथे घडली.

याप्रकरणी पिडीत २३ वर्षीय तरुणीने सुहास दत्तु रोकडे (वय २८, रा. वाघेरे कॉलनी नं.३. वृषाली हॉटेलजवळ, पिंपरीगाव) याच्या विरोधात निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत २३ वर्षीय तरुणी आणि आरोपी सुहास रोकडे हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सुहास याची पिंपरीगावत पिठाची गिरणी आहे. सुहासने सन २०१५ ते जुलै २०१८ दरम्यान वेळोवेळी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले, तसेच तिला मारहाण करुन शिरगाव येथील साई प्रज्ञा भक्त निवास येथे नेऊन वेळोवेळी बलात्कार केला. याप्रकरणी पिडीत तरुणीने निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस.डब्ल्यू.वाघमारे तपास करत आहेत.