आई वारल्याच्या दुसऱ्या दिवशीच सावत्र बापाने केला मुलीवर बलात्कार

583

भोपाळ, दि. २४ (पीसीबी) – आई वारल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून सावत्र बापाने १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तब्बल दोन महिने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मध्यप्रदेश येथील भोपाळमध्ये  घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीने सहावीत असतानाच शाळा सोडली. ही मुलगी तिच्या सावत्र वडिलांसोबत राहात होती. काही महिन्यांपूर्वी या मुलीची आई वारली. त्यानंतर तिच्या सावत्र वडिलांनी या मुलीवर बलात्कार करण्यास सुरूवात केली आणि या प्रकरणाची वाच्यता कोणाकडेही करू नकोस म्हणून धमकावले. पिडीतेने सावत्र वडिलांनी आपल्या लहान बहिणीवरही अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. ही मुलगी अत्याचार सहन करत होती. मात्र हे सगळे असह्य झाल्याने तिने आपल्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेला वडिल आपल्याशी कसे वागतात हे सांगितले. त्यानंतर या महिलेने पोलिसात तक्रार देत या सगळ्या प्रकाराला वाचा फोडली. माझी आई ज्या दिवशी वारली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पहिल्यांदा सावत्र वडिलांनी माझ्यावर बलात्कार केला असे या पीडित मुलीने सांगितले.

या मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती समोर आल्यावर मुलीच्या सावत्र वडिलांविरोधात पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या मुलीच्या सावत्र वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.