आई दवाखान्यात असताना महाराष्ट्राचा लढवय्या लेक मैदानात – जयंत पाटील

121

 

पुणे, दि.२३ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या शिलेदाराचा अभिमान असल्याचंही जयंत पाटील यांनी नमूद केलं. जयंत पाटील यांनी ट्विटरवर राजेश टोपेंच्या कामाचा एक व्हिडीओ पोस्ट करत आपली भावना व्यक्त केली.

आई दवाखान्यात असताना महाराष्ट्राचा लढवय्या लेक मैदानात आहे, असं म्हणत जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.

कोरोनावर मात करण्यासाठी राज्यसरकारने कंबर कसली आहे. आरोग्यमंत्री या नात्याने राजेश टोपे अहोरात्र झटत आहेत. राज्यातील प्रत्येक माणसाच्या स्वास्थ्याची काळजी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिलेदाराला सलाम. जनसेवेसाठी सदैव कार्यरत रहा या शुभेच्छा. संकट मोठे आहे, पण त्यावर मात करू, असं जयंत पाटील म्हणाले.

राजेश टोपे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावत कोरोना व्हायरस विरोधात जमिनीवर उतरुन काम करत आहेत. याचीच नोंद घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राजेश टोपे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.