आईने मुलाला केली लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण; व्हिडीओ व्हायरल

948

हरियाणा, दि. १९ (पीसीबी) –  चिमुकल्याने बिछान्यावरच शौचक्रिया केली म्हणून एका निर्दयी आईने मुलाला  लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना हरियाणातील सिरसा येथे घडली.

या घटनेमध्ये ४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्या आजीने सिरसा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिछान्यावरच शौचक्रिया केली म्हणून संतापलेल्या निर्दयी आईने स्वत: च्या ४ वर्षीय मुलाला लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण केली आहे. या घटनेच्या व्हिडीओमध्ये महिला ४ वर्षाच्या मुलाला लाथा-बुक्क्यांनी अमानुषमणे मारहाण करताना दिसत आहे. मुलगा जोरजोरात रडत असतानाही ही निर्दयी आई त्याच्या पोटात आणि पाठीत लाथा मारताना दिसतेय.  चिमुकल्याच्या आजीने केलेल्या पोलीस तक्रारीनंतर ही घटना समोर आली असून, त्या आजीने मारहाण करतानाचा व्हिडीओ देखील पोलिसांना दिला आहे. तक्रारीनंतर  आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सिरसा पोलिस तपास करत आहेत.