आईची बदनामी करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ

32

मोशी, दि. २९ (पीसीबी) – आईची बदनामी करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केला. छळ करणा-या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार मोशी परिसरात ऑगस्ट महिन्यात घडला आहे.

गिनदेव नामदेव वाघमारे (वय 31, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पिडीत मुलीने याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी घरात एकटी असताना आरोपीने त्याचा गैरफायदा घेतला. मुलीच्या आईची बदनामी करण्याची धमकी देऊन वारंवार तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले. हा प्रकार मुलीने घरच्यांना सांगितल्यानंतर याबाबत 28 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare